तिसऱ्या तिमाहीत खतांची आयात वाढली- अहवाल
24 February 08:30

तिसऱ्या तिमाहीत खतांची आयात वाढली- अहवाल


तिसऱ्या तिमाहीत खतांची आयात वाढली- अहवाल

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये युरिया आणि डी-अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी या सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या खतांच्या आयातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे केअर रेटिंग एजन्सीने प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामाच्या आधी असणारा तोकडा साठा आणि या खतांच्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात आयात करणे भाग पडले आहे.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होण्याच्या संभ्रमामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच खत उत्पादन व साठवणुकीत घट पहिली जात होती. युरिया आयात एक तृतीयांशने तर डीएपीच्या आयातीत ६६.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र असे तरी तिसऱ्या सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या म्यूरेट ऑफ पोटॅशच्या (एमओपी) आयातीत तिसऱ्या तिमाही दरम्यान घट नोंदवली गेली आहे. अशी माहिती केअर रेटिंग एजन्सीच्या संशोधन विश्लेषक उर्विशा एच. जगशेठ यांनी दिली आहे.संबंधित बातम्या