देशी दुधाळ जनावरांच्या विकासासाठी १८ गोकुळ ग्राम स्थापित- कृषिमंत्री
20 February 08:30

देशी दुधाळ जनावरांच्या विकासासाठी १८ गोकुळ ग्राम स्थापित- कृषिमंत्री


देशी दुधाळ जनावरांच्या विकासासाठी १८ गोकुळ ग्राम स्थापित- कृषिमंत्री

कृषिकिंग, नवी दिल्ली: “देशातील दुधाळ जनावरांच्या देशी जातींचे संरक्षण करण्यासाठी आणि विकासासाठी डिसेंबर २०१४ मध्ये सरकारने राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना सुरु केली आहे. त्यासाठी सध्यस्थितीत देशातील १२ राज्यांमध्ये १८ गोकुळ ग्रामची स्थापना करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत देशातील २८ राज्यांमधून प्राप्त प्रस्तावांसाठी १३५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यातील ५०३ कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. ही योजना देशातील देशी जातींच्या दुधाळ जनावरांच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.” असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले आहे.

या गोकुळ ग्राम केंद्रामध्ये विकसित केल्या गेलेल्या देशी प्रजातीच्या दुधाळ जनावरे शेतकऱ्यांना पुरवली जाणार आहे. या केंद्रांना राष्ट्रीय कामधेनु प्रजनन केंद्र असे नाव देण्यात आले आहे. ज्याअंतर्गत गाईंच्या ४१ आणि म्हशीच्या १३ प्रजातींचे संरक्षण केले जाणार आहे.टॅग्स

संबंधित बातम्या