गाईच्या शेणाचा शेतात वापरच नाही! आणि कशी होणार सेंद्रिय शेती...
19 February 14:15

गाईच्या शेणाचा शेतात वापरच नाही! आणि कशी होणार सेंद्रिय शेती...


गाईच्या शेणाचा शेतात वापरच नाही! आणि कशी होणार सेंद्रिय शेती...

कृषिकिंग, पुणे: २०१५ मध्ये सरकारने देशातील पारंपारिक संसाधनांचा वापर करत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ४१२ कोटींची तरतूद करत पारंपारिक कृषी विकास योजना (पीकेवीवाई) सुरु केली. मात्र, सेंद्रिय शेतीतील सर्वात महत्वाचा घटक गाईचे शेण हे शेतीमध्ये वापरलेच जात नाही. दररोज हजारो टन गाईचे शेण शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरले जाण्याऐवजी ग्रामीण भागात इंधन म्हणून गोवऱ्या बनवण्यासाठी वापरले जात आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरून ग्रामीण भागात इंधन उपलब्ध करून देत, शेणाचा वापर शेतीमध्ये होणे गरजेचे आहे.

हरित क्रांतीच्या काळात सधन शेतीमध्ये हजारो टन केमिकल, रासायनिक खते शेतीमध्ये टाकले गेले. त्याचा परिणाम होऊन जमिनीतील जैविक तत्वे कमी झाली, मातीच्या पीएचचे संतुलन बिघडले, आणि सूक्ष्म पोषण मूल्यांच्या कमतरतेमुळे जमीनीचे आरोग्य धोक्यात आले. हे पाहता, असे उपाय शोधण्याची गरज आहे. ज्यातून शेतीमध्ये अधिकाधिक गाईच्या शेण खताचा वापर कसा करता येईल. गाईचे शेण जैविक कार्बनचा महत्वपूर्ण स्त्रोत असून, त्यामुळे मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. ज्यातून पिकांची उत्पादकता वाढून, उत्पादकता स्थिर होण्यास मदत होते.

मात्र, सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सेंद्रिय शेती, जैविक शेतीचा डंका वाजवत भारतीय शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या बाता मारत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाणार असे सांगितले जात आहे. मात्र, विरोधाभास हा आहे की ज्यावेळी हजारो रुपये खर्च करून एखाद्या राज्यातील हजारो हेक्टर जमीन ही जैविक शेती म्हणून ओळखली जाते. त्याचवेळी ती एकट्या शेतकऱ्यांच्या भरोस्यावर सोडली जाते. मग सरकारचे काम संपले असे मानून त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जाते. कारण शेतकरी हे सेंद्रिय शेती करण्यासाठी आणि सेंद्रिय उत्पादनांची मार्केटिंग करण्यासाठी सक्षम नसल्यामुळे त्यांचा सेंद्रिय शेतीतील ओढा कमी होतो. आणि ते पुन्हा रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर करण्यास सुरुवात करतात. अनेक राज्यांची हीच स्थिती असून, तिथे हे सर्व होत आहे.संबंधित बातम्या