दुग्धउत्पादनासाठी देशी गाईंची क्रेझ वाढली...
11 February 11:05

दुग्धउत्पादनासाठी देशी गाईंची क्रेझ वाढली...


दुग्धउत्पादनासाठी देशी गाईंची क्रेझ वाढली...

कृषिकिंग, पुणे: उत्तर भारतात अशा उच्च प्रतीच्या गायींच्या प्रजातीचा वापर दुग्धउत्पादनासाठी करण्यासाठी क्रेझ वाढली आहे. ज्यांची किंमत ६ लाख रुपयांपर्यंत असते. या गाईंचे दुध अमृत समान मानले जाते. हैद्राबाद येथील अनुवंशिकता संशोधन केंद्राची मोहर लागताच या गाईंचे दर आकाशाला भिडतात. विशेष म्हणजे या सर्व भारतीय देशी प्रजातीच्या गाई आहेत.

संशोधकांनी असे प्रमाणित केले आहे की, भारतीय प्रजातीच्या गाईच्या दुधात पौष्टिकता ही अधिक असते. त्यामुळे देशातूनच नाही तर विदेशातूनही विशेषतः ब्राझीलसारख्या देशातूनही भारतीय प्रजातीच्या गाईंच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. ज्या भारतीय प्रजातींच्या गाईंना सर्वाधिक मागणी आहे त्यामध्ये गिर, सहिवाल, लाल सिंधी, थरपार्कर, कांक्रेज यांचा समावेश आहे. उत्तराखंड मधील बद्री गाईची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु असे असले तरी देशातील उच्च प्रजातीच्या गाईंची संख्या खूप कमी आहे.

देशातील प्रमुख देशी गाई:
१. गिर गाय- वर्षभरात २००० ते ६००० हजार लिटर दुध देते. आणि ती मुख्यतः सौराष्ट्र आणि गुजरात मध्ये आढळते.
२. सहिवाल गाय- वर्षभरात २००० ते ४००० हजार लिटर दुध देते. आणि ती मुख्यतः उत्तरप्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांमध्ये आढळते.
३. लाल सिंधी- वर्षभरात २००० ते ४००० लिटर दुध देते. तिची उत्पत्ती सिंध प्रांतात झाली असली तरी ती संपूर्ण भारतात आढळते.
४. राठी- वर्षभरात १८०० ते ३५०० लिटर दुध देते. आणि ती मुख्यतः राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या राज्यांमध्ये आढळते.
५. थरपार्कर- वर्षभरात १८०० ते ३५०० लिटर दुध देते, आणि ती मुख्यतः सिंध, कच्छ, जैसलमेर, जोधपुर परिसरात आढळते.
६. कांक्रेज- वर्षभरात १५०० ते ४००० हजार लिटर दुध देते, आणि मुख्यतः उत्तर गुजरात आणि राजस्थान मध्ये आढळते.टॅग्स

संबंधित बातम्या