देशातील युरिया आयातीत घट
07 February 17:18

देशातील युरिया आयातीत घट


देशातील युरिया आयातीत घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: "चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत देशातील युरियाची आयात घसरून ती ४९.८३ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच याच कालावधीत ४९.८८ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत युरियाच्या आयातीत ०.०५ लाख टनांनी घट नोंदवली गेली आहे." अशी माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री राव इंदरजीत सिंग यांनी लोकसभेत दिली आहे.

तर चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरदरम्यान देशात १७७.८४ लाख टन युरियाचे उत्पादन झाले आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या