युरिया आयातीसाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करणार- सिंह
04 January 16:55

युरिया आयातीसाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करणार- सिंह


युरिया आयातीसाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करणार- सिंह

कृषिकिंग, नवी दिल्ली: “युरिया आयात ही मागणी-पुरवठ्यातील असलेल्या अंतराच्या गतीशास्त्रावर आधारित असून, भारत सरकारने २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात युरिया आयातीसाठी १४ हजार कोटी रुपये इतका अर्थसंकल्पीय खर्च निर्धारित केला आहे.” अशी माहिती रसायन आणि खत नियोजन राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी दिली आहे.

२०१५-१६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारी कालावधीत देशात ८१.२६ लाख टन युरिया आयात केली गेली. सध्यस्थितीत युरियाची आयात कमी झालेली आहे. कारण देशांतर्गत युरियाचा पुरवठा चांगला आहे. तसेच देशांतर्गत युरिया उत्पादन गेल्या वर्षी २० लाख टनांनी वाढून ते २४५ लाख टनांपर्यंत वाढल्याने देशात मोठा स्टॉक उपलब्ध आहे.

युरियाची वार्षिक देशांतर्गत मागणी अंदाजे ३०० लाख टन इतकी आहे. सध्यस्थितीत जवळपास २४५ लाख टन देशांतर्गत उत्पादनाद्वारे युरिया उपलब्ध आहे. उर्वरित मागणीच्या पूर्ततेसाठी आयात माध्यमातून पूर्तता केली जाईल. देशात आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये ३०६.१० लाख टन, २०१५-१६ मध्ये ३०६.३५ लाख टन, तर २०१६-१७ मध्ये २९६.१४ लाख टन युरियाचा वापर करण्यात आला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या