देशातील युरियाचे उत्पादन ७२.१४ लाख टनांपर्यंत वाढवणार- सिंह
21 December 08:30

देशातील युरियाचे उत्पादन ७२.१४ लाख टनांपर्यंत वाढवणार- सिंह


देशातील युरियाचे उत्पादन ७२.१४ लाख टनांपर्यंत वाढवणार- सिंह

कृषिकिंग, नवी दिल्ली: “येत्या काळात बंद पडलेल्या अवस्थेत असलेल्या युरिया प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करून, आयातीत कपात करण्यासह देशातील युरियाची उत्पादनक्षमता ७२.१४ लाख टनांपर्यंत वाढवणे अपेक्षित आहे.” अशी माहिती केंद्रीय रसायने व खतनियोजनमंत्री इंद्रजीत सिंह यांनी दिली आहे.

संसदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना इंद्रजीत सिंह यांनी सांगितले आहे की, “फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा खत प्रकल्प, हिंदुस्तान फर्टिलायझर कार्पोरेशन लिमिटेड अर्थात एफसीआयएलच्या ताल्चेर, रामागुंडम, गोरखपूर आणि सिंदरी येथील प्रकल्पांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर बारौनी येथे एचएफसीएलच्या नवीन अमोनिया-युरिया प्रकल्पाची स्थापना करुन त्याद्वारे दरवर्षी १२.७ लाख उत्पादन सरकारला अपेक्षित आहे.” रामागुंडम येथील प्रकल्पाचे व्यावसायिक उत्पादन २०१८ पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून, तर उर्वरित चार प्रकल्पांद्वारे २०२० पर्यंत उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. असेही ते म्हणाले.

भारत युरियाचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उपभोक्ता असून, मागील आर्थिक वर्षात देशात २४१.९ लाख टन युरिया उत्पादन झाले होते. तर ५४.८१ लाख टन युरियाची आयात करण्यात आली होती.संबंधित बातम्या