भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून स्ट्रॉबेरीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध
07 December 12:40

भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून स्ट्रॉबेरीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध


भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून स्ट्रॉबेरीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध

कृषिकिंग, शिमला (हिमाचल प्रदेश): “भारतीय कृषी संशोधन संस्थेला (आयएआरई) स्ट्रॉबेरीच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ज्यांची नावं 'जतोग स्पेशल' आणि 'शिमला डिलीशियस' अशी ठेवण्यात आली आहे. स्ट्रॉबेरीच्या या दोन नवीन प्रजाती खाण्यासाठी अधिक चविष्ट आणि अधिक उत्पादन देणाऱ्या आहेत. या दोन्ही प्रजातींवर गेल्या अनेक दिवसांपासून आयएआरईच्या ढांढा येथील संशोधन केंद्रावर संशोधनकार्य सुरु होते.” अशी माहिती भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयएआरई) संशोधकांकडून देण्यात आली आहे.

“स्ट्रॉबेरीच्या या प्रजातींची शेती ही मैदानी क्षेत्रात तसेच उंच सखल भागात केली जाऊ शकते. तसेच या दोन्ही प्रजाती या टेबल फॉरमॅट सर्वोत्कृष्ट मानल्या जाऊ शकतात.” असेही त्यांनी सांगितले आहे.संबंधित बातम्या