१० कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डचे वाटप- कृषिमंत्री
06 December 17:20

१० कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डचे वाटप- कृषिमंत्री


१० कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डचे वाटप- कृषिमंत्री

कृषिकिंग, नवी दिल्ली: “शेतातील मृदा परीक्षण करून त्याआधारे पिकांना खते आणि अन्य पोषक तत्वे देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या मृदा आरोग्य कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत १० कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले आहे.” अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली आहे. मृदा आरोग्य कार्ड या योजनेअंतर्गत लवकर मृदा परीक्षण होऊन शेतकऱ्यांना मदत व्हावी. यासाठी तयार करण्यात आलेल्या अॅपचे उद्घाटन हरियाणामधील झज्जर येथील कृषी विज्ञान केंद्रात सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

“फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड उपलब्ध करून देण्यासोबतच, २०२२ पर्यंत युरियाचा वापर हा ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.” अशी माहितीही सिंह यांनी यावेळी दिली आहे.संबंधित बातम्या