आंध्र प्रदेशातील गोवंश करतोय ब्राझीलचा कायापालट, काय आहे खासियत?
03 December 13:00

आंध्र प्रदेशातील गोवंश करतोय ब्राझीलचा कायापालट, काय आहे खासियत?


आंध्र प्रदेशातील गोवंश करतोय ब्राझीलचा कायापालट, काय आहे खासियत?

कृषिकिंग, ब्राझील: भारत गोठ्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. दक्षिण आशियात आढळणाऱ्या गुरांची असंख्य जाती भारतात आहेत. जगभरातील अनेक देशांकडून झेबू जातीची आयात केली जात असे. गरम हवामानामुळे नवीन रोग प्रतिकारक्षम प्रजाती तयार होतील आणि कमी दर्जाच्या चाऱ्यावर टिकून राहतील. अनेक जाती दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला पाठवल्या गेल्या आहेत. परंतु दक्षिण भारतातील तेलगू उत्पादकांच्या निलोर किंवा ओंगळ जातीने ब्राझील मध्ये क्रांती केली आहे.

निलोर हे परदेशी व्यक्तींनी दिलेले नाव आहे. मद्रास प्रांतामधील निलोर जिल्ह्यात असलेल्या या गाईच्या वास्तव्यावरून हे नाव देण्यात आले तर ओंगळ तालुक्यात असणा-या उगमस्थानावरून ओंगळ हे नाव दिले गेले. झेबू जातीप्रमाणेच ओंगळ जातीच्या जनावरांच्या खांद्यावर कुबट असते. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषि संघटनेच्या (एफएओ) च्या अहवालानुसार, जगभरातील ईतर पशुधनाच्या जातीप्रमाने ओंगळचे प्रजनन क्षेत्र ओंगल जिल्ह्यात आहे. ओंगळ हे फार दंड व भव्य दिसणारी गाय आहे. आकाराने प्रचंड, अत्यंत नम्र व स्थिर आहे. निरनीराळ्या भौगोलिक परीस्थीतीमध्ये त्यांची कामगिरी चांगली आहे. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते काम, दुध आणि मांस या तीनही हेतुसाठी उपयुक्त आहे. भारतामध्ये ओंगळचे प्रजनन, खात्रीलायक पाणी नसलेल्या व जास्त पिके नसलेल्या ठिकाणी होते. अशा ठिकाणी वासरे आणि तुपापासून मिळणाऱ्या उत्पन्नावर तिथल्या लोकांचे आर्थिक व्यवहार चालतात.

निलोर जातीच्या चांगल्या जनावरांची उंची १५- १७ हात उंच आहे. त्यांची सहनशक्ती आणि शरीरयष्टी उत्तम आहे आणि ते सहसा हालचाल आणि चळवळीमध्ये मंद आहेत. त्यांच्या लहान शिंगांवरून ते लगेचच ओळखायला येतात. त्यांची शिंगे हि ३ ते ६ इंच लांब असतात, तर अपवादात्मक घटनांमध्ये १२ इंचापर्यंत आणि आतील बाजूनी वाकडी असतात. डोळे मोठे आणि पाणीदार असतात त्यांचे कपाळ आणि कान मोठे असतात. त्यांचा रंग पांढरा आहे.

त्यांच्या कणखरपणा, उदरनिर्वाहता आणि उत्पादकतेमुळे ओंगळ गाय जगाच्या इतर भागाकडे लवकरच वळेल यात आश्चर्य नाही. या गोपालकाची माहिती १८६८ मध्ये नोंदवली आहे त्यानंतर बाहिया, रियो डी जानेरिओ मध्ये नोंदवली गेली. त्यानंतर ब्राझील, युएसए, मेक्सिको, मध्य अमेरिका, व्हेनेझुएला आणि आर्जेन्टिना मध्ये प्रसार झाला. आज ब्राझीलमध्ये १०० दशलक्ष निलोर गाई आहेत. हा ब्राझीलीयन शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचा पुरावा आहे. आर्थिक कारण हे एक त्यांच्या लोकप्रियतेचे आर्थिक कारण आहे. निलोर गाईची लवचीकता आणि उत्पादनक्षमतेमुळे ती लोकांच्या आवडीची गाय बनली आहे.
१९ व्या शतकाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय ओंगलला ब्राझीलच्या निलोरमध्ये बदलण्याचा प्रयोग सुरु झाला आणि या देशातील पशुधनाचे व्यापारीकरण केले गेले. दहा वर्षानंतर परदेशी जनावरे ब्राझीलमध्ये आणली गेली. आणि त्यांनंतर हळूहळू निलोर गाईचा विस्तार होत गेला. आज ब्राझिलमध्ये २०० दशलक्षपेक्षा जास्त गोमांस आणि डेअरी गाईचे कळप आहेत. त्यापैकी निलोर हे १०० दशलक्षपेक्षा आधीक आहेत. निरोगी आणि नैसर्गिक मांस जगभरातील १४६ पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करत असून त्याची मागणी वाढत आहे. आज ब्राझील पारंपारिक बीफ उत्पादक देशांपैकी एक असून, बीफ ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत आहे. ब्राझीलच्या बीफ गोवर असणाऱ्यामध्ये ६५ % निलोर आधारित आणि ८५ % निलोर प्रभावित आहेत. ब्राझीलच्या एका अनुवांशिक पशुवैद्यकानुसार, “निलोर गाय कठीण हवामान, पौष्टिक आणि स्वच्छताविषयक परिस्थितीत त्याच्या कठोरपणामुळे आणि अवाढव्य क्षमतेमुळे आदर्श आहे”.संबंधित बातम्या