युरिया उत्पादनात ३ लाख टनांनी घट होण्याची शक्यता
28 November 08:30

युरिया उत्पादनात ३ लाख टनांनी घट होण्याची शक्यता


युरिया उत्पादनात ३ लाख टनांनी घट होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: “आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये देशातील युरियाचे उत्पादन २.४४ कोटी टन इतके राहिले आहे. यावर्षी युरियाचे उत्पादन हे सध्या अस्थायी असून, त्यात ३ लाख टन इतकी घट होण्याची शक्यता आहे. मात्र असले तरी गेल्या २ वर्षांत देशातील युरियाचे उत्पादन हे वाढले आहे. परंतु, हे वाढलेले उत्पादन देशातील ३.२ कोटी टन या देशातील एकूण वार्षिक मागणीच्या अजूनही बरेच कमी आहे. त्यामुळे उर्वरित मागणीची पूर्तता करण्यासाठी युरियाची आयात करावी लागते.” अशी माहिती कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने दिली आहे.

“सरकार देशातील युरियाचा खप घटवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण युरियाची किंमत ही अन्य खतांच्या तुलनेत कमी आहे. कडूनिंबाच्या लेपापासून निर्मित युरियाची निर्मिती करण्याची सरकारची योजना असून, पुढील वर्षापासून सरकारने या युरियाची विक्री ही ५० किलोच्या गोणीऐवजी ४५ किलोच्या गोणीत करण्याची योजना तयार केली आहे.” असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या