देशाच्या उभारणीत कृषी शास्त्रज्ञांचे मोठे योगदान- परोडा
05 November 16:10

देशाच्या उभारणीत कृषी शास्त्रज्ञांचे मोठे योगदान- परोडा


देशाच्या उभारणीत कृषी शास्त्रज्ञांचे मोठे योगदान- परोडा

कृषिकिंग, हैदराबाद: “देशाच्या उभारणीत कृषी शास्त्रज्ञांचे योगदान मोठे असून गेल्या ५० वर्षांत देशाने आरोग्य आणि अन्नधान्य क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. लाखो भारतीय लोकसंख्येसाठी पुरेशा अन्नधान्याच्या उपलब्धतेमुळे आरोग्य क्षेत्राचेही चांगले प्रदर्शन झाले आहे. याचे संपूर्ण श्रेय हे कृषी शास्रज्ञांना जाते.” असे कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे माजी सचिव तसेच भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी महासंचालक आर.एस. परोडा यांनी म्हटले आहे.

नॅशनल अकॅडमी ऑफ ऍग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट (नारम), राजेंद्रनगर येथे कृषी शास्त्रज्ञ मंडळाच्या (एएसआरबी) ‘फाऊंडेशन डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

परोडा यांनी नोबेल पुरस्कारार्थी नॉर्मन बोरलॉग यांच्यासारख्या वैज्ञानिकांसोबत काम केलेले आहे. यावेळी त्यांनी त्या काळातील कृषी शास्त्रज्ञांसमोर येणाऱ्या आव्हानांची माहिती दिली आणि त्यांना कसे तोंड द्यावे. तसेच सध्या भारतात पुरेशा प्रमाणात अन्नधान्य कसे उपलब्ध करून देता येईल. याविषयी मार्गदर्शन केले सांगितले. या कार्यक्रमासाठी देशभरातून २०० पेक्षा जास्त कृषी शास्रज्ञ उपस्थित होते.संबंधित बातम्या