इस्रायली कंपनी भारतात गायींचा सरोगसी प्रकल्प सुरु करणार
26 October 15:50

इस्रायली कंपनी भारतात गायींचा सरोगसी प्रकल्प सुरु करणार


इस्रायली कंपनी भारतात गायींचा सरोगसी प्रकल्प सुरु करणार

कृषिकिंग, मुंबई: “भारतातील मध्यमवर्गीयांची दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एक इस्रायली कंपनी मुंबई जवळ ‘सरोगेट काऊ फार्म’ अर्थात गायींची कृत्रिम गर्भधारणा तंत्राने निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करीत आहे. कंपनीकडून या सरोगसी प्रकल्पांतर्गत ४० उच्च प्रतीच्या (चांगल्या टक्केवारीच्या) हॉलीस्टीन गायी ठेवण्यात येणार आहे. या गाईंचे फलित बीज इतर ४५० सरोगेटेड गाईंच्या उदरात कृत्रिम रीत्या रोपित करण्यात येणार आहे. या सरोगेटेड गाईंपासून जन्माला आलेल्या वासरांना (कालवडींना) शेतकऱ्यांना विकण्यात येणार आहेत. उच्च दर्जाच्या मूळ बीज दात्या गाईंच्या बीजासोबत अमेरिका, युरोप तसेच इस्राईल येथुन मागविलेल्या पशुंचे सीमेन वापरले जाणार आहे.” अशी माहिती एलेफबेट प्लॅनर्स या इस्रायली कंपनीने एका ई-मेलद्वारे प्रसिद्ध केली आहे.

भारत दुग्ध उत्पादनात अग्रेसर असला तरी भारतातील दुग्धव्यवसाय हा कमी उत्पादनक्षम समजला जातो. देशात मुख्यतः पाच गायी किंवा म्हशी असलेल्या लहान शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. भारतात कमी अनुवंशिक क्षमता (कमी टक्केवारी) हा गायींची उत्पादकता प्रभावित करणाऱ्या प्रमुख घटकांपैकी एक आहे.

मॅक्झिमिल्क ही इस्रायली कंपनी एलेफबेट प्लॅनर्स या सहयोगी कंपनीसोबत भारतातील गोदरेज ग्रुपच्या संयुक्त भागीदारीतून मुंबई जवळच्या परिसरात हा गायींचा कृत्रिम गर्भधारणा प्रकल्प सुरु करणार आहे. “या प्रकल्पामुळे गायींच्या गर्भधारणेकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष करणाऱ्या भारतीय दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना प्रजनन प्रक्रिया सक्षम बनवण्यास मदत होणार असून, ३२ महिन्यांच्या आत दुध उत्पादन देणाऱ्या गायींची निर्मिती होण्यास मदत होणार आहे.” असेही कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या