कृषी विकासाला गती देण्यासाठी जर्मन अॅग्री बिजनेस अलायन्स सोबत करार
19 September 08:30

कृषी विकासाला गती देण्यासाठी जर्मन अॅग्री बिजनेस अलायन्स सोबत करार


कृषी विकासाला गती देण्यासाठी जर्मन अॅग्री बिजनेस अलायन्स सोबत करार

कृषिकिंग, नवी दिल्ली: भारतीय अन्न आणि कृषी परिषेदेने (आयसीएफए) जर्मन अॅग्री बिजनेस अलायन्स (जीएए) सोबत अन्न व कृषी क्षेत्रातील व्यापार, तंत्रज्ञान आणि व्यापार सहकार्य, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे. तसेच धोरणात्मक मुद्द्यांवर कार्य करून तंत्रज्ञान आणि व्यापार सहकार्य करण्याच्या उद्देश्याने दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये एक सामंजस्य करार केला आहे. जीएएचे व्यवस्थापकीय संचालक एलाना गुम्पर आणि आयसीएफएचे महासंचालक आलोक सिन्हा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

जीएए ही जर्मनीच्या कृषी-अन्न उद्योगातील अग्रेसर संघटना असून, आर्थिक कार्यकलापांना आणि भागीदार देशांना मदत करण्यासाठी मूलभूत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरचनेत सुधारणा करणे हा या संघटनेचा उद्देश आहे.

अन्न आणि कृषी क्षेत्रातील आयसीएफए एक सर्वोच्च धोरण संशोधन संस्था आहे. त्यामुळे भारत आणि जर्मनी यांच्यातील हे सहकार्य भारतीय शेती आणि शेती व्यवसाय क्षेत्रांच्या विकासाला गती देण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. तसेच उद्योग, गुंतवणूकदार, सरकार आणि इतर भागधारकांमध्ये परस्परांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि विविध अडचणींचा सामना करण्यासाठी मदतगार ठरणार आहे.संबंधित बातम्या