जीएसटीमुळे खतांच्या किमतीत घसरण
05 July 18:05

जीएसटीमुळे खतांच्या किमतीत घसरण


जीएसटीमुळे खतांच्या किमतीत घसरण

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी या करप्रणालीमध्ये शेतीशी निगडीत बियाणे जीएसटीमुक्त करण्यात आले आहे. तर ही नवीन करप्रणाली खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आहे. खतांवर आकारला जाणारा १२ टक्के जीएसटी ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे खतांच्या जुन्या किमती आता ५ ते ७० रुपयांपर्यंत कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे खत विक्री करणाऱ्या कंपन्यांनी त्यानुसार नवीन दरपत्रकही जाहीर केले आहे.

यामुळे जुन्या दरानुसार ३०० रुपये विकला जाणारा युरिया आता नवीन दरानुसार २९४ रुपये दराने विकला जाणार आहे. डीएपी खत जुन्या दरानुसार ११०० रुपये दराने विकले जात होते. ते आता नवीन दरानुसार १०७८ रुपये दराने विकले जाणार आहे. तर २०:२०:१३ सुफला खत जुन्या दरांनुसार ८०० रुपये दराने विकले जात होते ते आता नवीन दरानुसार ७८४ रुपयांना विकले जाणार आहे.

सध्या पेरणी आणि शेतीच्या मशागतीचे दिवस असून शेतकरी शेतीमध्ये कामाला लागले आहेत. त्याचवेळी लागू झालेल्या नवीन करप्रणालीमुळे खताचे भाव कमी झाले. यामुळे ऐन पेरणी आणि मशागतीच्या वेळी शेतकऱ्याला दिलासा मिळाला आहे. बाजारात खतांची मोठ्या प्रमाणात आवकही आहे. यामुळे हवी ती खते मिळत आहेत, तीही आधीपेक्षा कमी भावात. यामुळे होत असलेल्या पैशांच्या बचतीचा आनंद शेतकऱ्यांमध्ये दिसतो आहे.संबंधित बातम्या