कापूस दरात वाढ, निर्यातीत घट
02 July 11:05

कापूस दरात वाढ, निर्यातीत घट


कापूस दरात वाढ, निर्यातीत घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशांतर्गत कापसाचे भाव वाढल्यामुळे त्याचा कापसाच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे. भारतीय कापूस महामंडळा (सीसीआई) च्या आकडेवारीनुसार, यावर्षी कापसाच्या निर्यातीत १० टक्क्यांनी घसरण होऊन, कापसाची निर्यात ६० लाख गाठी राहण्याची शक्यता आहे.

भारतीय कापूस महामंडळाचे चेअरमन आणि व्यवस्थापाकीय संचालक बी.के.मिश्रा यांनी सांगितले आहे की, या वर्षी देशात कापूस उत्पादन करणाऱ्या प्रदेशात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. यावर्षी कापसाचे ३.५३ कोटी गाठी इतके उत्पादन राहण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी कापसाचे ३.८० कोटी गाठी झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनात घट होऊन कापसाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

मागील काही दिवसांत कापसाचे दर ३४ हजार रुपये खंडी (७४६ किलो) असताना, कापसाच्या दरात ३५ हजार रुपये खंडी (७४६ किलो) पर्यंत वाढ झाली आहे. आणि येणाऱ्या काळात कापसाच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. असेही मिश्रा यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कापसाच्या दरात कोणताही बदल झाला नसल्यामुळे कापूस व्यापाऱ्यांना स्थानिक बाजारात नफा मिळत आहे. ज्यामुळे व्यापारी कापसाची निर्यात करण्यापासून दूर राहत आहेत. आतापर्यंत कापसाची ५० लाख गाठी इतकी निर्यात झाली. आणि यात कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही.संबंधित बातम्या