कांदा उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ३०२ रुपये तोटा
28 June 17:03

कांदा उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ३०२ रुपये तोटा


कांदा उत्पादकांना प्रति क्विंटलमागे ३०२ रुपये तोटा

कृषिकिंग, लासलगाव: मागील एक वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी अनेक समस्यांना सामोरे जात आहे. त्यातच आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटलला ३०२ रुपयांचे नुकसान सहन करत कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्र सरकारला पत्र पाठवून या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.

मागील १ वर्षापासून कांदा उत्पादक शेतकरी कमी दराने आपला कांदा विकत आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांनी आपला कांदा १ रुपये प्रति किलोने विकला. त्यामुळे यात शेतकऱ्यांना फायदा होणे तर दूरच मोठा तोटा सहन करावा लागला. अखिल भारतीय भाजीपाला उत्पादक महामंडळाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी सांगितले आहे की, कांद्याचा उत्पादन खर्च ८२७ रुपये असताना, बाजार समित्यांमध्ये सरासरी ५२५ रुपये दराने कांदा खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटलमागे ३०२ रुपये तोटा सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर कांदा भावात सुधारणा करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत, ३.९५ लाख टन कांदा खरेदी केला. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी ही अशा पद्धतीने कांदा खरेदी करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. जेणेकरून, शेतकऱ्यांना कमीत-कमी त्यांचा उत्पादन खर्च तरी मिळू शकेल.संबंधित बातम्या