घानामध्ये भारतीय टोमॅटोच्या प्रजाती
23 June 07:05

घानामध्ये भारतीय टोमॅटोच्या प्रजाती


घानामध्ये भारतीय टोमॅटोच्या प्रजाती

कृषिकिंग, पुणे: राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळाकडून (एनआरडीसी) घाना देशामध्ये टोमॅटोच्या प्रजाती विकसित केल्या जात आहे. २०१५ मधील भारत-आफ्रिका शिखर संमेलनात १३ कोटी रु.च्या या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. सरकारने घानामध्ये केलेल्या संशोधनानुसार, अधिक उत्पन्न आणि चविष्ट टोमॅटोचे उत्पादन घेतले गेले आहे. २०१५ मध्ये सुरवात केलेल्या या इंडो-घाना टोमॅटो उत्पादन प्रकल्पाला मागील आठवड्यात यश आले आहे. दोन्ही देशांनी टोमॅटोच्या शेतीचा विस्तार करण्यासाठीच्या करारावर पुन्हा सहमती दर्शवली आहे.

राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ (एनआरडीसी) ने या प्रकल्पाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत घानाच्या पश्चिमी भागात प्रत्येकी ५ एकरच्या तीन भूखंडांवर टोमॅटोच्या प्रजातीचे संशोधन करण्यात आले. क्षेत्रीय अभ्यास म्हणून, २०१५ मध्ये घानातील कुमासी, एडा आणि नवरोगो या ठिकाणी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती. घानातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अधिक उत्पादनासोबतच भारतीय प्रजातींनी अंगभूत गुण, आणि दोन आठवड्यांपर्यंत तग धरून राहण्याची क्षमता प्रदान केली आहे.

घाना आपल्या शेजारील देशांकडून आपल्या गरजेच्या ६० टक्के टोमॅटोची आयात करतो. घानामध्ये अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती आणि नवीन शेती तंत्रज्ञानावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूक केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.संबंधित बातम्या