कतारमध्ये भारतीय फळे आणि भाज्यांना मागणी
22 June 08:45

कतारमध्ये भारतीय फळे आणि भाज्यांना मागणी


कतारमध्ये भारतीय फळे आणि भाज्यांना मागणी

कृषिकिंग, पुणे:भारतातून कतारला होणारी ताज्या फळांची आणि भाज्यांची निर्यात मागील दोन आठवड्यांपासून १५ टक्क्यांनी वाढली आहे. कारण सौदी अरेबिया आणि शेजारील देशांनी कतारला लागून असलेल्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत. ज्यामुळे या देशांतून कतारला होणारा फळे आणि भाज्यांचा पुरवठा बंद झाला आहे. सौदी अरब, संयुक्त अरब, मिस्र, बहरीन आणि यमन या देशांनी कतारबरोबर असलेले संबंध तोडत जमिनी, समुद्री आणि वायू संपर्क तोडण्याची ही घोषणा केली होती. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारतातून कतारला ताजी फळे आणि भाज्यांची निर्यात होण्यास वाढ झाली होती. त्यानंतर मालदीव आणि लिबिया यांनीही कतारबरोबर असलेले संबंध संपुष्टात आणले. त्यामुळे भारतीय फळे आणि भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली.

पुरवठा कमी होऊन महागाई वाढू नये म्हणून मागणी पूर्ण करण्यासाठी कतार वायुमार्गानेही फळे आणि भाज्यांची आयात करत आहे. अनेक मालवाहक विमान कंपन्यांनी मागील दोन आठवड्यांत कतारमध्ये मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्या पोहचविले आहेत.

या सर्व घटनाक्रमाची कबुली देत, कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शेजारील देशांतून फळे आणि भाज्यांची निर्यात बंद झाल्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून भारतातून फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत मोठय प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच भारतातील स्थानिक फळे आणि भाज्या उत्पादक शेतकरी उत्पन्न आणि गुणवत्तेवर लक्ष देत आहेत, ज्यामुळे मागील तीन वर्षांपासून भारतातून होणारी फळे आणि भाज्यांची निर्यात कतार मोठ्या प्रमाणात वाढवत आहे.संबंधित बातम्या