पेट्रोल डीझेल स्वस्त
16 June 12:06

पेट्रोल डीझेल स्वस्त


पेट्रोल डीझेल स्वस्त

कृषिकिंग,दिल्ली: भारतीय तेल कंपन्यांनी देशातील वाहन चालकांना दिलासा दिला आहे. काल मध्यरात्रीपासून पेट्रोलचे दर प्रतिलिटर १ रुपये १२ पैसे आणि डिझेलचे दर प्रति लिटर १ रुपये २४ पैशांनी कमी झाले आहेत.
सध्या दर पंधरा दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतला जातो. यानुसार गुरुवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीच्या आधारे ही दरकपात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
जगातील बहुतांश प्रगत बाजारांप्रमाणेच भारतातही आजपासून आंतरराष्ट्रीय दरांशी सुसंगतता राखून देशभरातील पेट्रोल व डिझेलचे दर दररोज निश्चित करण्यात येणार आहे. पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवल्यानंतर १६ जूनपासून सरकारी तेल कंपन्या देशभरातील सर्व म्हणजे ५८ हजार पेट्रोल पंपावरील पेट्रोल व डिझेलचा दररोज आढावा घेणार आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीतील चढउतार आणि विदेशी चलनाच्या विनिमय दरातील बदल यावर आधारित पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी बदलतील. पेट्रोल वितरकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून वितरकांनीही संपावर जाण्याचा इशारा दिला होता.संबंधित बातम्या