शेतकरी संप, सरकारचं अपयश, संघाचा घराचा आहेर
10 June 13:01

शेतकरी संप, सरकारचं अपयश, संघाचा घराचा आहेर


शेतकरी संप, सरकारचं अपयश, संघाचा घराचा आहेर

कृषिकिंग, नवी दिल्ली: मोदी सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरल्याचे भारतीय किसान संघ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनेचे उपाध्यक्ष प्रभाकर केळकर यांनी म्हटले आहे. भारतीय किसान संघाने थेट मोदी सरकारवर टीका केली असल्याने सरकारसाठी हा घरचा आहेर ठरला आहे.

शेतकऱ्यांना नाईलाजास्तव शेतमाल कमी किमतीला विकावा लागत असून तसेच रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत आहे, असे म्हणत भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष प्रभाकर केळकर यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी पूर्णपणे रोख रकमेवर अवलंबून असतात. अचानक पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. भाकड जनावरांच्या आठवडा बाजारातील विक्रीवर निर्बंध आणण्याच्या पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयामुळेदेखील शेतकऱ्यांचे नुकसान झाले, असेदेखील प्रभाकर केळकर यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. भाकड जनावरांची विक्री करता न आल्यास ती जनावरे शेतकऱ्यांसाठी ओझे ठरतात, असेही त्यांनी सांगितले आहे.



संबंधित बातम्या