भारतातील मधमाश्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर
05 June 17:51

भारतातील मधमाश्यांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर


भारतातील मधमाश्यांच्या प्रजाती  लुप्त होण्याच्या मार्गावर

अलीकडे झालेल्या एका अभ्यासानुसार व शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ओडिसा राज्यातील काही मधमाशांच्या प्रजातीत 80 टक्क्यांनी घट झाली असून यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहे. याच प्रकारची माहिती पंजाब, केरळ, महाराष्ट्र आणि त्रिपुरा या राज्यातील शेतकऱ्यांमार्फत मिळालेली आहे. मधमाश्यांच्या संख्येबाबत पूर्वीची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे शास्त्रज्ञांना या माहितीची शहानिशा करण्यात अडचण येत आहे.
‘बायोलॉजिकल कॉन्झर्वेशन’ या पुनरावलोकन केलेल्या व मे २०१७ मध्ये प्रकाशित नियतकालिकात शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीची भर घालून भारतातील माहिती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मधमाशांच्या वसाहती नष्ट होत असल्याचा अहवाल २००६ पासून जगभरात नोंदविला गेला आहे. मधमाश्यांमार्फत अन्नधान्य पिकांच्या परागीकरणाचे मुख्य कार्य केले जाते परंतु गेल्या काही दशकात मधमाश्यांच्या प्रजाती नष्ट होत असल्याने पिकांच्या उत्पादनात ८० टक्केपर्यंत घट येण्याची शक्यता आहे जे विशेषतः मानवी जीवनासाठी चिंताजनक आहे.
मागील २०वर्षांपासून जगभरातील शास्त्रज्ञांना यामागील गूढ लक्षात येत नव्हते. 2012 च्या सुमारास प्रकाशित झालेल्या अभ्यासात मधमाशांच्या कार्यास हानिकारक अशा निओकोकोटीनॉईड्स या कीटकनाशकामुळे मधमाश्यांची संख्या कमी झाल्याचे निष्पन्न झाले. मधमाश्यांची कमी होणारी संख्या जैवविविधतेस सुद्धा हानिकारक आहे. बासू आणि त्यांचे सहकारी यांनी स्थानिक शेतकरी कार्यकर्ते यांच्या मदतीने मधमाशांची संख्या घटण्याच्या वेगवेगळ्या पैलुंचे दस्तावेजीकरण केले आहे त्यानुसार कीटकनाशकाच्या संपर्कात येणाऱ्या मधमाश्यांत ऑक्सिडेशनचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते वयाने लवकर वाढतात आणि ज्या जमिनीत कीटकनाशकांचा कमी वापर करण्यात येतो तिथे मधमाश्यांची संख्या जास्त आढळून येते. तिसऱ्या अभ्यासानुसार कीटकनाशकांच्या संपर्कात आल्याने मधमाश्या त्यांची गंध क्षमता गमावतात पर्यायी ते पोळ्याकडे परत येऊ शकत नाही.
भारतात मधमाशा पालन व त्यासंबंधी प्रचार यांची कमतरता असल्यामुळे सुद्धा मधमाशांच्या संख्येत व विविधतेत घट होण्याचे कारण आहे. केंद्र आणि राज्य सरकार ‘एपीस मेलीफेरा’(Apis mellifera) या जास्त मधाचे उत्पादन देणाऱ्या व झुंडीत कमी फिरणाऱ्या पश्चिम युरोपीय मधमाशीपालनासाठी प्रोत्साहन देत आहे. परंतु यामुळे सुद्धा काही नवीन समस्या निर्माण होऊ शकतात कारण एकाच प्रजातीला पर्यावरणात स्थान मिळाल्यास इतर प्रजाती कमी होऊन विविधतेवर परिणाम होईल. तसेच अशा फारच कमी वनस्पती आहेत ज्यांना एकाच प्रजाती कडून परागकण मिळतात.संबंधित बातम्या