जनावरांच्या आहारात कोरड्या /वाळलेल्या चाऱ्याचे महत्व
16 May 07:30

जनावरांच्या आहारात कोरड्या /वाळलेल्या चाऱ्याचे महत्व


जनावरांच्या आहारात कोरड्या /वाळलेल्या चाऱ्याचे महत्व

संतुलित आहार शास्त्रानुसार जनावरांच्या वयोमानाप्रमाणे त्यांच्या पोटात शुष्क पदार्थ (ड्राय मॅटर) जास्तीत जास्त जाणे महत्त्वाचे आहे. त्यांची तब्येत चांगली राहण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचा कोरडा, वाळलेला चारा त्यांना खाण्यास देणे गरजेचे आहे. दूध देणाऱ्या व ४५० ते ५०० किलो वजन असलेल्या गायी/म्हशीला रोज ५ ते ७ किलो असा चारा दिला पाहिजे. बऱ्याच वेळेला बारा महिने हिरवा चारा भरपूर असणाऱ्या गोपालकांकडे कोरड्या चाऱ्याची वानवा असते मग या कोरड्या / शुष्क (ड्राय मॅटर) पदार्थांची भर करण्याकरिता भरपूर प्रमाणात पशुखाद्य खाल्ले जाते त्यामुळे जनावरांना शेण सतत पातळ असणे, शेणाला दुर्गंधी येणे, दुधाला वेगळा वास येणे, चयापचयाचे आजार होणे, गाभण राहण्यास त्रास देणे यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते.

जनावरांच्या आहारात जास्तीचे खनिज मिश्रण देणे सुद्धा फार गरजेचे आहे. पशुंना उसाचे टनेज खायला दिल्यास त्यात अनेक प्रकारची अशुद्ध तत्वे किंवा रसायने असतात. ही तत्वे पोटात गेल्यावर आहारातील कॅल्शियम, कॉपर, कोबाल्ट, मॅग्नेशिअम, झिंक अशा महत्त्वाच्या खनिजांबरोबर संयुगे तयार होऊन ती खनिजे शरिराला मिळू देत नाहीत म्हणून ज्या गायी/म्हशींना रोज ५० ते ६० वाढे खाण्यास देतात त्यांना रोज ६० ते ७५ ग्रॅम जास्तीची खनिज मिश्रणे देणे महत्त्वाचे आहे.

-डॉ. वासुदेव सिधये, पशु व पक्षी रोग तज्ज्ञ.टॅग्स

संबंधित बातम्या