मिश्र आणि मुक्त पशुसंगोपन
14 May 07:30

मिश्र आणि मुक्त पशुसंगोपन


मिश्र आणि मुक्त पशुसंगोपन

पशुसंगोपन हा शेतीला पूरक पण अतिशय शाश्वत असा नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. घरोघरी गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या यांचे व्यवस्थित संगोपन केल्यास कौटुंबिक गरजेपुरते पौष्टिक दूध, अंडी, मांस तसेच शेतीस उपयुक्त शेणखत आणि पैसे मिळतात. मुळात शेतकऱ्यांनी त्यांच्याजवळ उपलब्ध असलेले स्त्रोत जसे जमीन, पाणी, वीज, मनुष्यबळ अगदी उपलब्ध पैसा याचा सुद्धा शास्त्रीयदृष्ट्या योग्य वापर करून आणखी पैसा कसा कमविता येईल हे पहायला हवं.

मिश्र आणि मुक्त पद्धतीत एक जोडप्यास एकाच फार्ममध्ये ३ ते ५ गाई, १० ते १५ शेळ्या अणि ५० ते १०० गावरान कोंबड्या मुक्त संचार पद्धतीने संगोपित करता येते. याकरिता आपल्या जवळील उपलब्ध जागा कंपाउंड करून बंदिस्त करावी व त्याचे दोन भाग करावेत. एका भागात गाईंसाठी शेड आणि मोकळी जागा तयार करावी. उरलेल्या अर्ध्या भागात शेळ्यांकरिता "साठी" पद्धतीचा गोठा बांधावा. मध्यवर्ती ठिकाणी आणखी एक शेड बांधावे ज्यामध्ये कोंबड्या ठेवता येतील आणि त्यांना दोन्ही बाजूच्या जागेत सहज मोकळा संचार शक्य असेल. याप्रमाणे फार्म उभारल्यास गाई, कोंबड्या आणि शेळ्या एकत्रित सांभाळता येऊ शकतात.

या पद्धतीने फार्म सुरु केल्यास मिळणारे उत्पन्नही तीन प्रकारात विभागून मिळेल.
१) दरमाही उत्पन्न - दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला उत्पन मिळेल
२) त्रैमासिक उत्पन्न - गावरान कुक्कुट पालनामार्फत दर तीन महिन्यांनी उत्पन मिळते तसेच रोजची अंडी देखील उत्पन्नाचे स्त्रोत आहे.
३) सहामाही उत्पन्न - शेळ्यांच्या पिलांच्या विक्रीतून सहामाही उत्पन मिळते.
प्रीतम नलावडे, कराडटॅग्स

संबंधित बातम्या