दूध धंद्यातील नफा तोटा : भाग ३
12 May 09:00

दूध धंद्यातील नफा तोटा : भाग ३


दूध धंद्यातील नफा तोटा : भाग ३

रोखीचे पत्रक (cashflow statement)
तुम्ही दरमहा रोखीने किती कमवता आणि रोख पैसा किती येतो जातो, (गुंतवणूक किंवा खर्च, तसेच निव्वळ विक्री किंमत) त्याचा विचार रोखीचे पत्रक म्हणजे (कॅश-फ्लो स्टेटमेंट ) मध्ये होतो. मोठे मोठे बिझनेस नवीन गुंतवणुकीची संधी शोधताना त्या त्या व्यवसायाच्या कॅशफ्लो स्टेटमेंटचा पुढील ५-१० वर्षांचा अंदाज घेऊन मग गुंतवणूक करतात.
समजा पहिल्या महिन्यात ५ लाख रुपये गुंतवले, खर्च २० हजार झाला आणि दूध विक्री १० हजार झाली तर १०,००० वजा ५,२०,००० म्हणजे उणे ५,१०,००० तुमचा कॅशफ्लो झाला. पूर्ण वर्षाच्या आकडेमोडीमध्ये हा कॅशफ्लो धन (शून्यापेक्षा मोठा) पॉजिटिव्ह झाला, तर तुमचा व्यवसाय फायद्यात समजला जातो.

सामान्य शेतकरी, पशुपालकाला फक्त जमाखर्च पत्रक व्यवस्थित समजले तरी भरपूर आहे.

बारकाईने पाहिले तर, दुधाची विक्री किंमत तुम्हाला (rolling) रोख पैसे देते. खरा नफा होतो ते कालवडी तयार करून (गाभण करून किंवा अशाच) विकल्या तर. आणि मित्रांनो भरपूर वर्षे असाच नफेशीर धंदा चालू ठेवला तर तुमची मूळ गुंतवणूक (जागा, किंवा गोठा उभारणी खर्च, गाई खर्च, स्वतः राबलेला खर्च) वसूल होतो.
डॉ. शैलेश मदने, डेयरी फार्म सल्लागार
स्त्रोत- पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या