दूध धंद्यातील नफा तोटा: भाग २
11 May 07:30

दूध धंद्यातील नफा तोटा: भाग २


दूध धंद्यातील नफा तोटा: भाग २

ताळेबंद पत्रक (Balance Sheet)
ताळेबंद पत्रकामध्ये एका बाजूला तुमची गुंतवणूक किंमत (assets) आणि दुसऱ्या बाजूला देणे (कर्ज/liability) यांचा समावेश असतो.
ताळेबंद मध्ये नेहमीच गुंतवणूक = देणे (assets = liability ) हा हिशोब असतो.
तुम्ही ५ लाख रुपये स्वतःचे किंवा बँकेमधून कर्ज काढून व्यवसायात टाकले तर ५ लाख तुमचे देणे (liability) झाली. त्यात तुम्ही ३ लाख गाईवर टाकले, १ लाखाचे बांधकाम, आणि १ लाख मशिनरी घेतली तर ५ लाख देणे झाले. तुमची बॅलन्स शीट ५ लाखाची झाली.

जर तुम्हांला कालवडी मिळाल्या तर त्यांची विक्री करण्यापूर्वी किंमत ताळेबंद पत्रकामध्ये assets (स्थावर) च्या रकान्यामध्ये बेरीज होईल आणि liability मध्ये गुंतवणूक किंवा विक्रीपूर्व नफा (unrealized profit) मध्ये समावेश होईल.
१ कालवड झाली (समजा १०,००० रुपये किंमत ) तर दोन्ही बाजूस १० हजार बेरीज होईल. ताळेबंद पत्रक ५ लाख १० हजारांचे होईल.
जर तुम्हाला पहिल्या वर्षी तोटा झाला तर ते तोट्याची किंमत assets मधून वजा होईल. समजा १ लाख रुपये तोटा झाला, तर दोन्ही बाजूला १ लाख वजा होऊन ताळेबंद पत्रक ४ लाखांचे होईल.
हा हिशोब असा असतो की समजा तुम्ही रातोरात सर्व गाई,गोठा विकून धंदा बंद केला तर गुंतवणूकदाराला ४ लाख रुपये मिळतील.

डॉ. शैलेश मदने, डेयरी फार्म सल्लागार
स्त्रोत – पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या