दूध धंद्यातील नफा तोटा: भाग १
10 May 07:30

दूध धंद्यातील नफा तोटा: भाग १


दूध धंद्यातील नफा तोटा: भाग १

खूपदा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा?
बहुसंख्य लोक त्यांच्या अनुभवामुळे या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात.
कुठल्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम त्याचा हिशोब ठेऊन फायदा-तोटा मोजणे आणि लिहून ठेवणे महत्वाचे असते. ते पुढीलप्रमाणे जाणून घेऊ या
१) नफा तोटा पत्रक
२) ताळेबंद पत्रक
३) रोखीचे
यातल्या नफा तोटा पत्रकात नफा मोजला जातो.
नफा तोटा पत्रक पुढीलप्रमाणे आहे : नफा = मिळकत – खर्च

नफा: मिळकतीमध्ये दुधाची, कालवडीची, शेणखत व गायीची विक्री किंमत या सर्व गोष्टींचा समावेश होतो. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष विक्री किंमत म्हणजे विकल्यानंतर हातात आलेली रक्कम. न विकलेल्या गोष्टी नफातोटा पत्रकात येणार नाही.
खर्च: यात पुढील खर्चाचा समावेश होतो. उदा. खाद्य,औषधे, चारा, वीज-पाणी, मजुरी इत्यादीचा खर्च. तुम्ही स्वतः राबत असाल तर तोच पगार खर्च, तसेच गाई विकत घेतल्याचा खर्च, गोठा उभारणीचा खर्च प्रत्येक वर्षासाठी विभागून घ्यावा, कडबा कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन खरेदी किंमत त्यांच्या आयुष्यमानानुसार विभागून खर्च म्हणून समाविष्ट करावा. तुमच्या जागेची किंमत (भाड्याची किंवा विकत घेतलेली किंवा स्वतःचीच असली तरी) ती सुद्धा खर्च म्हणून विभागून वजा करावी. पहिल्या १-२ वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या मानाने होणारा तोटा पुढच्या ३-४ वर्षात विभागून खर्च म्हणून वजा करावा.
१० लाख रुपये विक्री किंमत मधून वर दिलेला सर्व खर्च वजा केल्यावर जी रक्कम उरेल तो तुमचा नफा असेल.

-डॉ. शैलेश मदने, डेयरी फार्म सल्लागार
स्त्रोत – पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या