उन्हाळ्यातील पोल्ट्री फार्मचे नियोजन
09 May 07:30

उन्हाळ्यातील पोल्ट्री फार्मचे नियोजन


उन्हाळ्यातील पोल्ट्री फार्मचे नियोजन

सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो. योग्य नियोजन केल्यास ब्रॉयलरचे उत्पादन वाढू शकते.
• पोल्ट्रीची बांधकामाची दिशा उत्तर-दक्षिण असावी. त्यामुळे सूर्यप्रकाश सरळ फार्ममध्ये न पडल्याने तापमान जास्त वाढत नाही.
• दोन फार्ममधील अंतर कमीत कमी २० मीटर असावे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हवा खेळती राहते.
• पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूने उंच व पसरट पाने असलेले वृक्ष लावावेत, यामुळे उन्हाच्या झळा कोंबड्यांना बसत नाहीत.
• पोल्ट्री फार्मचे छत गव्हाचा किंवा भाताचा कडबा किंवा उसाच्या पाल्याने झाकावे, यामुळे शेडमधील तापमान कमी राहते.
• शेडच्या छतामध्ये व भिंतीमध्ये २.६ ते ३.३ मी. अंतर ठेवावे. यामुळे हवा खेळती राहण्यास मदत होते.
• पोल्ट्री शेडच्या आजूबाजूने पांढरा कलर मारावा, यामुळे सूर्यप्रकाश परावर्तनास मदत होते.

-शिकलगार नवाज
स्त्रोत:विकासपिडियाटॅग्स

संबंधित बातम्या