उन्हाळ्यातील पशू आहार व्यवस्थापन
08 May 07:30

उन्हाळ्यातील पशू आहार व्यवस्थापन


उन्हाळ्यातील पशू आहार व्यवस्थापन

एप्रिल मे महिन्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वावटळीचा मोठा धोका असतो तेव्हा वावटळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी यंत्रणा, मनुष्यबळ तसेच सर्व प्रकारच्या पुनश्चः उभारणीसाठी सज्ज असावे. अवकाळी पावसापासून साठवलेल्या चाऱ्यास बुरशी येणार नाही यासाठी चाऱ्यावर संरक्षक पडदा टाकावा.

जनावरे सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत अजिबात चरावयास सोडू नका. जनावरांचा सगळा आहार दुपारी तीन ते दुसरे दिवशी पहाटे सहा पर्यंत पुरवा. पशुखाद्यात प्रती जनावरास शरीर वजनानुसार २० ते २५ ग्रॅम खाण्याचा सोडा द्या. शक्यतो ताक, गूळ, मीठ क्षार मिश्रणे दररोज द्या. जनावरांना ऊस, उसाचे वाडे, वाळलेला ऊस व उसाची पाने एकूण चाऱ्याच्या २० ते ३० टक्यांपेक्षा अधिक प्रमाणात देऊ नयेत. जनावरांना ऊसकुट्टी, ऊस पाने देण्याच्या एक दिवस अगोदर वाळवून यावर १ टक्का चुन्याची निवळी शिंपडावी. उन्हाळ्यात चारा टंचाईच्या काळात मुरघास अत्यंत उपयुक्त ठरतो. उन्हाळ्यात पुरविल्या जाणाऱ्या सर्व वाळलेल्या चाऱ्यावर युरिया, मळी, क्षार प्रक्रिया नेहमी फायद्याची ठरते. चाऱ्याची कमतरता लक्षात घेता उन्हाळ्यात पशुखाद्याची मात्रा/ प्रमाण वाढविणे गरजेचे असते.

डॉ. नितीन मार्कंडेय, पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणीटॅग्स

संबंधित बातम्या