कोंबड्यांना लसीकरण करताना घ्यायची काळजी
06 May 07:30

कोंबड्यांना लसीकरण करताना घ्यायची काळजी


कोंबड्यांना लसीकरण करताना घ्यायची काळजी

• रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. लसीकरण करण्यासाठी नेताना रोगप्रतिबंधक लस बर्फ ठेवलेल्या भांड्यातूनच न्यावी.
• वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. त्या लशीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते. वापरून उरलेली लस, बाटल्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावावी.
• लसीकरणासाठी वापरलेली सिरिंज, सुया, भांडी स्वच्छ धुऊन निर्जंतुक करून घ्यावी.
• लसीच्या उत्पादक कंपनीचे नाव, लसीचा प्रकार, बॅच नंबर, लस तयार केलेली तारीख, लस उपयोगात आणण्याची अंतिम तारीख याचा तपशील नोंद करून लस वापरावी.
• लस टोचल्यानंतर पक्ष्यांना थकवा येऊ शकतो. याकरता लस टोचण्यापूर्वी तीन दिवस अगोदर आणि लस टोचणीनंतर पाच ते सहा दिवस सर्व पक्ष्यांना पाण्यातून अँटिबायोटिक्स द्यावीत.
• उन्हाळ्यात लस टोचणीचा कार्यक्रम असेल, तर रोगप्रतिबंधक लस सकाळी किंवा रात्री टोचावी. म्हणजे पक्ष्यांवर ताण येणार नाही.
• रोगप्रतिबंधक लसीकरण फक्त सशक्त पक्ष्यांना करावे.
• एका वेळी एकच लस टोचावी. एकाच वेळी दोन किंवा तीन लस दिल्यास रोगप्रतिकारशक्ती तयार होणार नाही. उलट पक्ष्यात विपरीत परिणामामुळे नुकसान होईल.

पाण्यातून लस देतांना
• काही वेळा पिण्याच्या पाण्यामधून काही रोगप्रतिबंधक लसीकरण केले जाते. अशा वेळेस लस ही पाण्यामध्ये समप्रमाणात विरघळली पाहिजे. प्रत्येक पक्ष्यास अपेक्षित लस मात्रा मिळाली पाहिजे, तरच पक्ष्यांमध्ये आपणास अपेक्षित रोगप्रतिकारशक्ती तयार होईल; अन्यथा लसीकरण केल्याचे समाधान मिळेल, पण अपेक्षित परिणाम मिळणार नाही.
• लसीकरणा अगोदर पक्ष्यांना भरपूर तहान लागली पाहिजे. पक्ष्यांना भरपूर तहान लागण्यासाठी पाण्याची भांडी रिकामी ठेवावीत.
• पाण्यात समप्रमाणात लस मिसळली जावी, यासाठी प्रथम दूध पावडर पाण्यात टाकून पातळ करा. दुधाच्या तयार झालेल्या गाठी पूर्णपणे विरघळाव्यात. जी लस द्यावयाची आहे, त्यावरील सूचनेप्रमाणे पाणी मिसळून हेच पाणी तहानलेल्या पक्ष्यांना पिण्यासाठी ठेवावे.
• लसमिश्रित पाणी संपल्याशिवाय दुसरे पाणी पक्ष्यांना देऊ नका.
• लसमिश्रित पाणी थंड राहावे म्हणून त्यामध्ये बर्फाचे खडे टाकावेत.

-स्त्रोत : विकासपिडिया.टॅग्स

संबंधित बातम्या