जनावरांतील संसर्गजन्य रोग उपचार व लसीकरण: भाग १
04 May 09:00

जनावरांतील संसर्गजन्य रोग उपचार व लसीकरण: भाग १


जनावरांतील संसर्गजन्य रोग उपचार व लसीकरण: भाग १

संसर्गजन्य रोग : हे रोग मुख्यतः विषाणू आणि जीवाणूंमुळे होतात. निरोगी जनावरांच्या शरीरात श्वसन, चारा, पाणी, सड, आजारी जनावराशी संपर्क आणि माणसांद्वारे रोगकारक जंतू प्रवेश करतात. जनावरांतील संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नियमित लसीकरण करून घ्यावे.
जनावरातील संसर्गजन्य रोगामध्ये अँथेक्स, काळा पाय, लाळ्या-खुरकत रोग, बुळकांडी रोग, स्तनदाह व पायकूज यांचा समावेश होतो.

१) अॅन्थ्रेक्स : गाईमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारा हा रोग असून घातकही आहे. या रोगामुळे जनावर जास्त दिवस जिवंत राहत नाही. हा रोग मोठे बीजाणू तयार करणा-या आयताकृती जीवाणूंपासून होतो. रवंथ करणा-या प्राण्यांमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळून येतो. या जीवाणूला बीज तयार करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. जनावरांमध्ये रोगाची लक्षणे जीवाणूच्या बीजांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर ३ ते ७ दिवसांनंतर दिसून येतात. जनावरांमध्ये लक्षणे दिसू लागल्यानंतर जनावर दोन दिवसांत मृत पावते. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने ज्यावेळी जनावरे चरण्यासाठी मोकळ्या कुरणात सोडलेली असतात, त्यावेळी हे बीजाणू श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करतात.

लक्षणे
1. जनावर सर्वसामान्य दिसत असताना २ ते ३ तासांत अचानक मृत पावणे हे प्रमुख लक्षण दिसून येते.
2. जनावरांना उच्च तापमान, घाबरल्यासारखे दिसणे, पाय तसेच शरीर थरथर कापणे, अशीही काही जनावरे थोड्या बहुत प्रमाणात लक्षणे दाखवतात.
3. श्वासोच्छवासात येणारा अडथळा, धाप लागणे, जनावर जमिनीवर पडणे, अशी लक्षणे मृत्यूपूर्वी २४ तास दिसून येतात.
4. जनावर मृत पावल्यानंतर शरीरातील रक्त गोठत नाही. त्यामुळे शरीराच्या उघड्या भागातून जसे की नाक, कान, तोंड यांमधून रक्तप्रवाह चालू होतो.

उपचार व नियंत्रण
1. रोगाची लागण झाल्यानंतर जनावर तत्काळ मृत पावत असल्यामुळे आपणाला यावर उपाय करणे शक्य नसते. त्यामुळे रोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करणे फायद्याचे ठरते.
2. प्रतिबंधक उपायांमध्ये प्रतिजैविकाचा वापर करण्यात यावा. पेनिसिलीन, टेट्रासायकलीन, इरिथोमायसिन व सिप्रोफ्लोक्झान इत्यादींचा त्यात समावेश होतो.

-स्त्रोत : विकासपिडियासंबंधित बातम्या