जनावरांतील संसर्गजन्य रोग उपचार व लसीकरण: भाग २
02 May 07:30

जनावरांतील संसर्गजन्य रोग उपचार व लसीकरण: भाग २


जनावरांतील संसर्गजन्य रोग उपचार व लसीकरण: भाग २

२) लाळ्या-खुरकत रोग: लाळ्या-खुरकत रोग या संसर्गजन्य रोगात तोंड, सड, खुराच्या मधून स्राव येत राहतो. रोगातून व्यवस्थितरीत्या बाहेर पडलेल्या जनावरांच्या पायाचे खूर खरबरीत व उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसतात. रोगाचा प्रसार प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा पाणी, शेण, चारा इ.च्या माध्यमातून अप्रत्यक्ष होतो. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करणा-या व्यक्ती, शेतातील उंदीर, जनावरे, पक्षी इ.च्या माध्यमातूनही प्रसार होतो.

लक्षणे:
1. उच्च ताप (१०४°- १०५° फेंरेनहाईट) येणे.
2. तोंडाद्वारे तंतुमय अशी लाळ सतत येत राहते.
3. तोंडावर व आतमध्ये पारदर्शक तंतुमय स्राव दिसू लागते.
4. शरीरात थकवा जाणवून अशक्तपणा येणे.
5. संकरित गाई या रोगास अत्यंत संवेदनशील आहेत.

उपचार:
1. जखमेच्या बाहेरील भागावर पुतिनाशक लावल्यास जखम भरून येण्यास व त्यावरती माश्या बसण्यास प्रतिबंध होतो.
2. सर्वसामान्य व स्वस्त उपाय म्हणजे जखम स्वच्छ करून घेऊन त्यावरती कोलटार व कॉपर सल्फेटचे ५:१ द्रावण लावणे.
3. सावधगिरी अ) जास्त दूध देणा-या दुभत्या गाई व विदेशी गायी ब) दोनदा प्रतिबंधक लसीकरण सहा महिन्यांच्या अंतराने करण्यात यावे. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक लसीकरण करणे आवश्यक आहे.
4. रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तत्काळ बोलावणे.
5. रोगाची लागण झालेल्या जनावरांची काळजी घेणा-या व्यक्ती, वापरण्यात येणारी उपकरणे ही वेगवेगळी असावीत. त्यांचा निरोगी जनावरांशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, ही उपकरणे योग्यरीत्या स्वच्छ व निर्जतुकीकरण करावीत.
6. अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी. माश्या, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवावे.

-स्त्रोत : विकासपिडिया.



टॅग्स

संबंधित बातम्या