जनावरातील विषाणूजन्य रोग: नीलजिव्हा
29 April 09:00

जनावरातील विषाणूजन्य रोग: नीलजिव्हा


जनावरातील विषाणूजन्य रोग: नीलजिव्हा

नीलजिव्हा हा विषाणूजन्य रोग प्रामुख्याने मेंढ्यामध्ये दिसून येतो व गाय, म्हैस वर्गात या रोगाची तीव्रता कमी असते. शेळ्यांमध्ये दिसणारा प्रमुख रोग असून या रोगाचा प्रसार क्युलीकॉइड नावाच्या चावक्या माश्यांच्या चाव्यावाटे होतो. लक्षणे: सुरुवातीला 24 ते 72 तासात मेंढ्यांना ताप येतो, तोंडाचा तसेच नाकाचा आतील भाग लालसर झालेला दिसतो व नाकातोंडातून सुरुवातीला पाणी स्रवते. नंतर त्याचे रुपांतर चिकट स्रावामधे होते. ओठ, नाक, कान, जीभ, हिरड्यांवर सूज येते. जीभ सुजलेली व निळ्या, जांभळ्या रंगाची दिसते. पायांतील सांध्यावर सूज येते व परिणामी मेंढ्या लंगडतात. या रोगात मेंढ्यांना फुफ्फुसदाह होऊन रोगाची लक्षणे दिसल्यापासून सहा ते सात दिवसात मरण पावतात. या रोगात जवळपास 30 टक्के मेंढ्याची मरतूक होते.

उपचार: रोगाची लक्षणे दिसल्यास पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. रोगी जनावराचे तोंड पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन घ्यावे व जखमेवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने मलम लावावा. या रोगाचा प्रसार क्युलीकॉइड नावाच्या चावक्या माश्यांच्या चाव्यावाटे होत असल्याने, या माशांचे नियंत्रण हेच या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरते. या रोगाचा प्रतिबंधाकरिता बाजारात प्रभावी लस उपलब्ध आहे करीता पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करावे.

-डॉ. रणजित इंगोले
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या