अॅझोला: जनावरांसाठी पौष्टिक खाद्य- फायदे
22 April 07:30

अॅझोला: जनावरांसाठी पौष्टिक खाद्य- फायदे


अॅझोला: जनावरांसाठी पौष्टिक खाद्य- फायदे

अॅझोला अत्यंत पौष्टिक शेवाळवर्गीय वनस्पती असून याचा वापर गायी, म्हशी, शेळ्या तसेच कोंबड्यांचा आहारामध्ये करतात. अॅझोलाच्या पौष्टिक गुणधर्माच्या तुलनेत उत्पादन खर्च फारच कमी आहे, म्हणजे सर्वसाधारण 1 ते 2 रुपये प्रति किलो एवढ्या कमी उत्पादन खर्चामध्ये घरच्या घरी तयार करून वापरला जाऊ शकतो.

अॅझोला खुराक:
जनावरांना अॅझोला देताना पहिले काही दिवस अॅझोला खुराकात म्हणजेच आंबोणात मिसळून द्यावा (1 : 1 प्रमाण). काही दिवसांनी सवय झाल्यावर अॅझोला नुसतासुद्धा खायला देता येतो. प्रति जनावरास 1.5 ते 2 किलोग्रॅम प्रतिदिन या प्रमाणात खाऊ घालावा.

कोरड्या अॅझोलाचे फायदे:
ज्या शेतकऱ्यांना पाण्याअभावी वर्षभर अॅझोला उत्पादन घेता येत नाही त्यांनी वरीलपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून एकदम उत्पादन घ्यावे आणि अतिरिक्त अॅझोला वाळवून ठेवावा आणि त्याचा वर्षभर पशुआहार म्हणून वापर करावा.

-लेखक- प्रीतम नलावडे
(बी. ई. मेकॅनिकल) कराड, सातारा, मो. ८४०८८०५६६१टॅग्स

संबंधित बातम्या