जनावरांचे स्वास्थ व औषधी वनस्पती भाग-२
21 April 09:00

जनावरांचे स्वास्थ व औषधी वनस्पती भाग-२


जनावरांचे स्वास्थ व औषधी वनस्पती भाग-२

शतावरी, कडूनिंब, कंबरमोडी, मेंदी या औषधी वनस्पती आपल्या अवतीभोवती असतात त्यांचा उपयोग योग्य प्रमाणात केल्यास आपल्याला जनावरांचे स्वास्थ चांगले ठेवण्यास नक्कीच मदत होईल.
१) शतावरी
औषधी उपयोग ः गाई म्हशीमधील दूध वाढविण्यासाठी
कोणत्या जनावरांना वापरावी ः गाई म्हशी (दुभती)
कोणत्या प्रकारे वापरावी ः शतावरी वनस्पतीच्या वाळविलेल्या मुळांची भुकटी
प्रकार/पद्धत/मात्रा ः रोज 30 ग्रॅम सकाळी व 30 ग्रॅम सायंकाळी खाद्यातून दूध देत असेपर्यंत.
२) कंबरमोडी
औषधी उपयोग ः मोठ्या जनावरातील किंवा शेळ्या मेंढ्यातील पोटफुगी दूर करण्यासाठी
कोणत्या जनावरांना वापरावी ः गाई, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या
कोणत्या प्रकारे वापरावी ः पानांचा रस
प्रकार/पद्धत/मात्रा ः मोठी जनावरे ः 100 मि.ली.
लहान जनावरे ः 30 मि.लि.
३) मेंदी
औषधी उपयोग ः सांधे सूज, पायांतील लचक
कोणत्या जनावरांना वापरावी ः बैल व इतर मोठी जनावरे
कोणत्या प्रकारे वापरावी ः हिरवा पानांचा ठेचा किंवा रस
प्रकार/पद्धत/मात्रा ः खांदेसुज असलेल्या जागी चोळावा
४) कडूलिंब
औषधी उपयोग- कोंबड्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती व वजन वाढ होण्यासाठी, वासरातील खजूर नाहीशी करण्यासाठी, वासरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी.
कोणत्या जनावरांना वापरावी: कोंबड्या (ब्रॉयलर), वासरे (गाई, म्हशी)
प्रकार/पद्धत/मात्रा: 1) वाळविलेल्या पानांची भुकटी
2) पानांचा रस पांढर्या व्हॅसलीनमध्ये मिसळून (1ः10 या प्रमाणात) मलम या स्वरुपात
3) वाळविलेल्या पानाची भुकटी
प्रकार/पद्धत/मात्रा
1) 2 ग्रॅम भुकटी प्रत्येकी 1 किलो खाद्यातून दररोज
2) खजूर असलेल्या जागी मलम चोळावा
3) रोज 20 ग्रॅम खाद्याद्वारे 2 ते 3 आठवडे.

-लेखक- प्रा. सहाणे प्रणिता प्रतापराव,
सा. प्राध्यापक ए. बी. एम. कॉलेज,संगमनेरटॅग्स

संबंधित बातम्या