जनावरांच्या गोठ्यासाठी जागेची निवड
19 April 07:30

जनावरांच्या गोठ्यासाठी जागेची निवड


जनावरांच्या गोठ्यासाठी जागेची निवड

गोठ्याची जमीन ही निसरडी / घसरडी नसावी. जमिनीवर पाणी मुत्र साठून रहाता कामा नये. जमिनीला खड्डे नसावेत. प्रमाणापेक्षा जास्त लांब, रुंद नसावी. (एक गायी/म्हशीला ४ फूट बाय ६.५ फूटएवढीच जागा ठेवा) उतार व्यवस्थित असलेली जमिन तयार करण्याकरिंता कडक विटा (खंगर प्रकारच्या), सिमेंट कोबा (जरा खरखरीत) किंवा शंकरपाळीच्या डिझाईनचा) दगडी फरशी, सर्वात शेवटी शहाबादी फरशी व कडक मुरूम, कोबा, शहाबादी फरशी यावर बराचे अंथरूण पसरल्यास फारच उत्तम. आपल्याकडे रबर वापरता आले नाही तर ऊसाचे पाचट, गव्हाचा गवंदा, खायला कडू असलेले गवत वगैरेचे अंथरुण घातले तर चांगल्या गायी खराब होणार नाहीत.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या