जनावरांचा गोठा कसा थंड ठेवावा?
16 April 07:30

जनावरांचा गोठा कसा थंड ठेवावा?


जनावरांचा गोठा कसा थंड ठेवावा?

गोठ्यात कधीही सिलींग फॅन लावू नयेत. १८० कोनात फिरणारे पंखे भिंतीवर बसवावेत. म्हणजे हवा सर्व बाजूनी खेळती राहिल (सिलींग फॅन छताला बसविल्यामुळे पंख्याखालील गायीला गरम हवेचा जास्त प्रमाणात त्रास होतो) गायीच्या गोठ्यांत पाण्याचे बारीक बारीक कण तयार करणारे फॉगर जमिनीपासून ८ ते ९ फूटांवर बसविणे गरजेचे आहे. त्याबरोबर फिरता पंखा असणे आवश्यक आहे. म्हशीच्या गोठ्यांत कधीही फॉगर बसवू नये. म्हशीच्या अंगावर जाड जाड थेंबाचे पाणी पडेल असे शॉवर म्हशीपासून (उभे राहिल्यानंतर) एक ते दीड फूटांवर बसवावेत. पंखा लावण्याची सोय नसेल तर गायी म्हशींच्या अंगावर गार पाण्याने भिजवलेली बारदान बांधावीत व अधूनमधून त्याच्यावर पाणी टाकत रहावे.

लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या