जनावरांना वाळलेला चारा देणे का गरजेचे आहे?
07 April 07:30

जनावरांना वाळलेला चारा देणे का गरजेचे आहे?


जनावरांना वाळलेला चारा देणे का गरजेचे आहे?

जनावरांना कोरडा / सुका / वाळलेला चारा देणे गरजेचे आहे काय?
संतुलित आहारशास्त्रदृष्ट्या जनावरांच्या वयोमानाप्रमाणे त्यांच्या पोटात शुष्क पदार्थ (ड्रायमॅटर) जास्तीत जास्त जाणे महत्त्वाचे आहे. त्यांची तब्येत चांगली राहण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचा कोरडा, वाळेलला चारा त्यांना कंपलसरी खाण्यास देणे जरुरीचे. म्हणून दूध देणाऱ्या व ४५० किलो वजन असेलल्या गायी / म्हशीला रोज ५ ते ७ किलो असा चारा दिला पाहिजे. बऱ्याच वेळेला बारा माहिने हिरवा चारा भरपूर असणाऱ्या गोपालकांकडे कोरड्या चाऱ्याची वानावा असते मग ह्या कोरड्या / शुष्क (ड्रायमॅटर) पदार्थांची भर करण्याकरिता भरपूर प्रमाणात पशुखाद्य खाल्ले जाते मग त्यांना अपचनाचे आजार होतात. त्यानं शेण सतत पातळ असणे, शेणाला दुर्गंधी येणे, दुधाळा वेगळा वास येणे, चायापचयाचे आजार होणे, गाभण राहण्यास त्रास देणे वगैरे.

-लेखक- डॉ. वासुदेव सिधये
मो. ९३७०१४५७६०.टॅग्स

संबंधित बातम्या