जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी
26 March 10:44

जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी


जनावरांना लसीकरण करतेवेळी घ्यावयाची काळजी

१. दर तीन महिन्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य जंतनाशक देणे. त्यामुळे लशीची ताकद व प्रभाव वाढतो.
२. आजारी तथा बाधित जनावराचे लसीकरण करू नये.
३. लसीकरण करतेवेळी पशुवैद्यकाला जनावराच्या गाभणपणाबद्दल माहिती जरूर दयावी.
४. जनावराचे लसीकरण शक्यतो सकाळी लवकर आठवा सायंकाळी करावे.
५. जनावरांना जंतनाशके दिल्याच्या तसेच लसीकरणाच्या नोंदी ठेवाव्यात.
६. जनावरांचे लसीकरण केल्यानंतर त्यांची सदर रोगाविरुद्धाची रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्यास साधारण २१ दिवस लागतात. त्या दरम्यान जनावरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

लेखक- डॉ. ऋषिकेश काळे,
पशुधन विकास अधिकारी पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या