दुधाच्या फॅट आणि डिग्री (एस.एन.एफ.) बद्दल थोडेसे...
12 March 07:30

दुधाच्या फॅट आणि डिग्री (एस.एन.एफ.) बद्दल थोडेसे...


दुधाच्या फॅट आणि डिग्री (एस.एन.एफ.) बद्दल थोडेसे...

आपल्याकडे दुधाला दर, त्यातील फॅट आणि डिग्री (एस.एन.एफ.) यावर अवलंबून असल्यामुळे कमी फॅट असणा-या दुधास दर कमी मिळतो. म्हणूनच दुधास फॅट कमी का लागते ? ती कशी वाढवावी ? हा बहुतेक दूध उत्पादकांचा ठरलेला प्रश्न असतो. शासन नियमानुसार गाईच्या आणि म्हशीच्या दुधास अनुक्रमे ३.५ आणि ६ टक्के फॅटचे प्रमाण असणे आवश्यक असते. यापेक्षा फॅटचे प्रमाण जास्त असल्यास त्यानुसार वाढीव दर दुधास मिळतो परंतू फॅटचे प्रमाण यापेक्षा कमी असल्यास दूध स्विकारले जात नाही. त्यामुळे असे दूध खूपच कमी दराने विक्री करण्याशिवाय उत्पादकास पर्याय नसतो. त्यामुळे दूध धंदा तोटयात जातो.

फॅटप्रमाणेच दूधास आवश्यकतेपेक्षा कमी डिग्री लागल्यासही दुधाची अस्विकृती होते आणि उत्पादकाचे नुकसान होते. अलीकडील काळात शासनाने याबाबतचे धोरण जरा जास्तच काटेकोर केले असल्यामुळे दूध उत्पादकांपुढे मोठे संकट उभे राहीले आणि त्यावर मात करण्यासाठी विविध अनैसर्गिक मार्गाचा अवलंब अविचाराने सुरू झाला आहे. त्यामुळे उत्पादकाचा तोटाच होत आहे. हे मात्र दुदैवाने त्यांच्या लक्षात येत नाही. यास कारण म्हणजे उत्पादकाकडे उद्योजकीय दृष्टीकोन नाही. या संकटावर यशस्वी मात करायची असल्यास दूध उत्पादकांनी शास्त्राचा आधार घेणे गरजेचे आहे.

-डॉ. एस.आर.कोल्हे,
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. जि. सातारा.टॅग्स

संबंधित बातम्या