सुप्त काससुजीमुळे दूधाची फॅट आणि डिग्री कमी लागते
10 March 09:00

सुप्त काससुजीमुळे दूधाची फॅट आणि डिग्री कमी लागते


सुप्त काससुजीमुळे दूधाची फॅट आणि डिग्री कमी लागते

दुभत्या जनावराचे आरोग्यदेखील दूधातील फॅट आणि डिग्री यावर परिणाम करते. जनावर अजारी पडल्यास दूध उत्पादन, फॅट आणि डिग्री यांच्या प्रमाणात घट येते. विशेषत: दुभत्या जनावरांना होणा-या ‘सुप्त काससुजी’ या रोगामुळे होणारे नुकसान मोठे असते. या रोगात सहज जाणवणारी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच या रोगास अदृश्य काससुजी असेही म्हणतात.

जनावराचे दूध उत्पादन फॅट आणि डिग्री यांच्या प्रमाणात काहीशी घट येते. ज्याचा संबंध आहार किंवा वातावरणातील बदलाशी जोडला जातो. त्यामुळे आजार दुर्लक्षित राहतो. अशाप्रकारे कित्येक दिवस ही घट कायम राहते. पर्यायाने होणारे नुकसान मोठे परंतू सहज लक्षात न येणारे असते. कित्येक दूध उत्पादकांना असा काही रोग जनावरांना होतो हे आजही माहीत नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपायही केले जात नाहीत म्हणून नुकसान होतच राहते.

-डॉ. एस.आर.कोल्हे,
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. जि. सातारा.संबंधित बातम्या