जनावरांना होणाऱ्या काससुजी रोगाची लक्षणे व उपाय
08 March 07:30

जनावरांना होणाऱ्या काससुजी रोगाची लक्षणे व उपाय


जनावरांना होणाऱ्या काससुजी रोगाची लक्षणे व उपाय

लक्षणे: अदृश्य काससुजी किंवा सुप्त काससुजी हा रोग काही दिवसानंतर दृश्य स्वरूपात येऊन ‘दृश्य काससुजी’ जनावरास होते. या रोगात जनावराची कास सुजणे, दुधातून गाठी, रक्त येणे, ताप येणे अशी लक्षणे दिसतात. यावेळी मात्र उत्पादकाची झोपच उडते. कारण हा रोग उपचार करूनही १०० टक्के नष्ट होत नाही. तो पुन्हा उद्भवतो आणि हजारो रूपयांचे नुकसान होते. काही वेळा रोगी कास निकामी देखील होते. हे टाळायचे असल्यास रोग अदृश्य अवस्थेत असतानाच प्रतिबंधक उपाय करावे. त्यामुळे तो १०० टक्के आटोक्यात राहतोच शिवाय दूधास फॅट व डिग्री कमी लागल्याने होणारे नुकसानही टळते.

उपाय: प्रत्येक वेळी धार काढल्यानंतर जनावराचे चारही सड जंतुनाशक द्रावणात बुडवावे आणि जनावर एक तासापर्यंत जमिनीवर बसणार नाही याची दक्षता घ्यावी. १५ दिवसांच्या अंतराने जनावराच्या दुधाची सी.एम.टी. तपासणी करून सुप्त काससुजी झालेली जनावरे ओळखून प्रतिबंधक उपाय करावे. सर्वांगीण स्वच्छता पाळावी. या उपाययोजना पशुवैद्यक तज्ञाकडून घेऊन उत्पादक स्वत: करु शकतात. त्यासाठी आवश्यक उपकरणे आणि रसायने बाजारात उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रत्येक जनावराकरिता वर्षाकाठी ५० ते ६० रू. खर्च येतो. ज्यामुळे पुढे होणारे हजारो रूपयांचे नुकसान टळते.

-डॉ. एस.आर.कोल्हे,
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ. जि. सातारा.टॅग्स

संबंधित बातम्या