संतुलीत पशुआहारातील चाऱ्याचे महत्व
05 March 07:30

संतुलीत पशुआहारातील चाऱ्याचे महत्व


संतुलीत पशुआहारातील चाऱ्याचे महत्व

संतुलीत पशुआहारात चाऱ्याचे महत्व फार मोठे आहे. निसर्गाने रवंथ करणारे प्राणी मुद्दाम निर्माण केले कि ज्यामुळे त्याच्या आहारात चारा ह्या शब्दाला जास्त महत्व येईल.

चाऱ्याची आहारात गरज का असते?
-कोठी पोटाच्या हालचाली करता (आकुंचन/ प्रसरण) उत्तेजन मिळते त्यामुळे कोठी पोटातील पचलेला आहार पुढे आतड्यात जायला मदत होते.
-चाऱ्यामुळे रवंथ करण्याच्या प्रक्रियेला तसेच जास्तीत जास्त लाळ तयार करण्याला उत्तेजन मिळते.
-चाऱ्यामुळे (आनुवंशिकते नुसार) दुधातील फॅटचे प्रमाण निश्चितपणे वाढते व त्याचे सातत्य रहाते.
-दुध तयार करणाऱ्या गायी/ म्हशींना त्याच्या एकूण मिश्रित आहाराच्या ३५ ते ४५ टक्के तरी चारा दिला पाहिजे.
-गायी/ म्हशी/ शेळ्यांना सर्वात स्वस्त आहार हा चाऱ्यातून मिळत असतो.
-चाऱ्यामध्ये कॅल्शीयम, पोटॅशियम व सूक्ष्म खनिजे ही पशुखाद्यापेक्षा जास्त असतात.
चाऱ्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे जास्त असतात. द्विदल चाऱ्यात बी ग्रुप जीवनसत्वे भरपूर असतात.

-डॉ. वासुदेव सिधये, मो. ९३७०१४५७६०टॅग्स

संबंधित बातम्या