कमी चाऱ्यावर गुजराण करणारी ओंगोले गाय
01 March 07:30

कमी चाऱ्यावर गुजराण करणारी ओंगोले गाय


कमी चाऱ्यावर गुजराण करणारी ओंगोले गाय

- मुखत्वे आंध्र प्रदेश मध्ये आढळून येणारी जात, शेती काम तसेच दूध या दुधारी कामासाठी उपयोगी आहे. ओंगोले प्रदेशातील असल्यामुळे हे नाव पडले. नेल्लोर म्हणून देखील प्रसिद्ध.
- रोगप्रतिकारक, काटक आणि कमी चाऱ्यावर गुजराण करू शकणे ही या जातीची वैशिष्ट्ये.
- ओंगोले जातीची निर्यात अमेरिकेत मांस, ब्राझील मध्ये मांस आणि दूध, तसेच श्रीलंका, फिजी, जमैका येथे शेतीकामासाठी करण्यात आली.
- चमकदार पांढरा रंग असून, मजबूत, छोट्या लांबीची शिंगे असतात. वर्षाकाठी सरासरी ७९८ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ३.७९ % लागते.

-डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठा.टॅग्स

संबंधित बातम्या