गुजरातची प्रसिद्ध गीर गाय
28 February 07:30

गुजरातची प्रसिद्ध गीर गाय


गुजरातची प्रसिद्ध गीर गाय

- गीर देखील साहिवाल, लाल सिंधी प्रमाणे भरपूर दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सुरती, गुजराती या नावाने देखील ओळखली जाते.
- गुजरातमधील गीर जंगलावरून या गाईचे नाव पडले आहे. बैल भरपूर अवजड कामे करू शकतात. आणि तणावामध्ये तग धरणारी म्हणून ही जात विख्यात आहे.
- कमी खाद्यातून जास्त दूध देण्याची खासियत आहे. ब्राझील तसेच अमेरिकेत देखील आयात करून यांचे संवर्धन करण्यात आले आहे.
- वर्षाकाठी सरासरी २११० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. ब्राझील मध्ये एका गाईने ६४ लिटर दूध दिल्याचे देखील बोलले जाते.
- स्तूप आकारातील कपाळ आणि लांब कान ही यांची ओळखू येणारी वैशिष्ट्ये.

-डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठाटॅग्स

संबंधित बातम्या