लाल सिंधी गाईची माहिती
27 February 07:30

लाल सिंधी गाईची माहिती


लाल सिंधी गाईची माहिती

- उष्ण हवामानात तग धरून राहणारी म्हणून ही जात प्रसिद्ध आहे.
- या गाईचा मूळ उगम पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. वैशिष्ट्यपूर्ण लाल रंग असून गडद लाल ते फिका पिवळा अशी विविधता पाहायला मिळते. शिंगे मजबूत आणि आडवे वर्तुळाकार वाढलेले दिसून येतात.
- साहिवाल जाती प्रमाणेच भरपूर दूध देणारी हि जात मानली जाते.
- अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स, ब्राझील, श्रीलंका इत्यादी देशात निर्यात होऊन या जातीवर संशोधन आणि संवर्धन करण्यात आले आहे.
- वर्षाकाठी सरासरी १८०० किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.५ % लागते.

-डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठा.टॅग्स

संबंधित बातम्या