नांदेडची लाल कंधार गाय
25 February 07:30

नांदेडची लाल कंधार गाय


नांदेडची लाल कंधार गाय

- या जातीचा उगम नांदेड मधील कंधार तालुक्यातील मानला जातो.
- लखलबुंधा असेही या जातीचे नाव आहे. ही जात दुष्काळी जात मानली जाते.
- साधारणतः गडद लाल रंग असून फिका ते अतिशय गडद (तपकिरी) अशी व्हरायटी देखील पाहायला मिळते. राजा सोमदेवराय याने कंधार गाईंना राजाश्रय दिल्याचे मानले जाते.
- भरपूर शेतीच्या कामात या जातीच्या बैलांचा उपयोग होतो.
- वर्षाकाठी सरासरी ५९८ किलो दूध दिल्याच्या नोंदी आहेत. सरासरी फॅट ४.५७ % लागते.

- डॉ. शैलेश मदने, पॉवरगोठा.टॅग्स

संबंधित बातम्या