म्हशीच्या सामान्य आजारांसंबंधी माहिती असुद्या
17 February 09:00

म्हशीच्या सामान्य आजारांसंबंधी माहिती असुद्या


म्हशीच्या सामान्य आजारांसंबंधी माहिती असुद्या

प्रत्येक म्हैसपालकाने म्हशीचे दूध उत्पादन नियमित व योग्य राहण्याकरिता म्हशींना निरोगी व सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. म्हशींना कोणत्या प्रकारचे आजार विविध अवस्थांमध्ये होतात, याबाबतची माहिती असावी. कोणते आजार हे सामान्य असतात. तसेच, गंभीर आजारामध्ये किती नुकसान होणार याचा अंदाज असणेही गरजेचे आहे.

सामान्य आजार जसे अपचन, भूक न लागणे, पोटफुगी, रवंथ न करणे इ.च्या नोंदी ठेवून घरगुती योग्य औषधांचा उपचार करण्यास हरकत नाही. म्हशीच्या चयापयाचे आजार जसे दुग्धज्वर, किटोसीस, प्रसूतिपश्चात हिमोग्लोबिन कमतरता हे कोणत्या घटकामुळे होतात व यासाठी प्रतिबंधक उपाययोजना काय अाहेत, याचीही माहिती असणे उत्पादनावर विपरीत परिणाम न होण्याकरिता आवश्यक आहे.

वातावरणात विविध जिवाणू व विषाणूंचा वावर असतो. अयोग्य व्यवस्थापनामुळे म्हशीची रोगप्रतिकार शक्ती घटते, त्यामुळे म्हशी विविध संसर्गजन्य रोगांना बळी पडतात. काही वेळेस म्हशींचा गर्भपात होतो, तसेच उत्पादन व प्रजननावरही विपरीत परिणाम होतो. पर्यायाने मोठा आर्थिक फटका बसतो. संसर्गजन्य आजार व यावरील लसीकरण नियमित करणे हे प्रतिबंधाकरिता महत्त्वाचे आहे. म्हशींच्या आरोग्य व्यवस्थापनामध्ये म्हशीचे प्रमुख चयापयाचे संसर्गजन्य आजार, जंत व गोचीड निर्मूलन व रोगाचे लसीकरण इ.चा समावेश होतो.

-डॉ. एम. व्ही. इंगवले,
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या