म्हशींना होणाऱ्या दुग्धज्वर रोगाची लक्षणे व उपाय
16 February 09:00

म्हशींना होणाऱ्या दुग्धज्वर रोगाची लक्षणे व उपाय


म्हशींना होणाऱ्या दुग्धज्वर रोगाची लक्षणे व उपाय

दुग्धज्वर (दूध ताप)
- अधिक दूध उत्पादन असणाऱ्या म्हशीमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो. मुख्यत्वे नुकत्याच विलेल्या म्हशीमध्ये प्रसूतिपश्चात ४८-७२ तासांत दिसतो. म्हशीच्या दुधावाटे शरीरातील कॅल्शिअम बाहेर पडल्यामुळे, आहारामध्ये कॅल्शिअमची कमतरता (गाभण काळामध्ये) इ. महत्त्वाच्या कारणांमुळे हा आजार होतो.

प्रमुख लक्षणे-
- शरीराचे तापमान कमी होते.
- म्हैस सुस्त, मान आडवी करून पडून राहते.
- म्हैस डोके छातीच्या बाजूस ओढून घेते.
- रवंथ, लघवी, संडास बंद होते, तसेच चारा खाणे बंद होते.
- कास व सड थंड लागतात.

उपाय-
- पशुवैद्यकाद्वारे रक्तातून कॅल्शिअम बोरोग्लुकोनेट इंजेक्शन त्वरित द्यावे.
- खाद्यामध्ये कॅल्शिअमयुक्त खनिजद्रव्यांचा व जीवनसत्त्वांचा पुरवठा करणे.
- आजार पुन्हा न होण्याकरिता तोंडावाटे कॅल्शिअम व ऊर्जा असणारी औषधे दिवसातून दोन वेळा चार-पाच दिवस द्यावीत.
- म्हशींना जीवनसत्त्व इ व फॉस्फरसचे इंजेक्शन द्यावे.
- अधिक दूध उत्पादन देणाऱ्या म्हशीमध्ये सौम्य स्वरूपाचा (Subclinical) दुग्धज्वर दिसून येतो. यामध्ये वरील लक्षणे दिसून येत नाहीत. परंतु, दुग्ध उत्पादन अपेक्षित मिळत नाही, किंवा कमी होते व प्रजननक्षमता कमी होते. याकरिता रक्तातील कॅल्शिअमची तपासणी करावी व प्रमाणापेक्षा ८-१२ मिलिग्रॅम प्रति डेसीलिटर कमी असल्यास आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवावे व पशुवैद्यकांकडून उपचार करावा.

-डॉ. एम. व्ही. इंगवले,
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या