असे करा म्हशींना होणाऱ्या किटोसीस रोगाचे नियंत्रण
15 February 07:30

असे करा म्हशींना होणाऱ्या किटोसीस रोगाचे नियंत्रण


असे करा म्हशींना होणाऱ्या किटोसीस रोगाचे नियंत्रण

किटोसीस
जास्त दूध देणाऱ्या म्हशीमध्ये आहारातील ऊर्जेच्या कमतरतेमुळे प्रसूतिपश्चात दोन ते चार आठवड्यांत प्रामुख्याने हा आजार दिसून येतो. गर्भावस्थेत संतुलित आहाराची कमतरता, प्रथिनांचे जास्त प्रमाण इ. प्रमुख कारणांमुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाल्यामुळे हा आजार होतो.

प्रमुख लक्षणे-
- दूध उत्पादन अचानक किंवा हळूहळू कमी होते किंवा दूध देणे बंद होते.
- म्हशीच्या श्वाासाचा किंवा मूत्राला गोड वास येतो.
- म्हैस प्रामुख्याने पशुखाद्य किंवा आंबवण खाणे कमी किंवा बंद करते.
- तीव्र आजारामध्ये लाळ गळते, म्हशीची अनैसर्गिक हालचाल होऊन तोल जातो. तसेच, कठीण वस्तूचा चावा घेण्याचा प्रयत्न करते.

उपचार-
- पशुवैद्यकाकडून शिरेद्वारे ग्लुकोज (२५ ते ४० टक्के) नसेतून वजनाच्या प्रमाणात द्यावे.
- शरीरामध्ये दररोज ग्लुकोज तयार होण्यासाठी जास्त ऊर्जेचे पदार्थ ५-७ दिवस द्यावेत. जसे गूळ, बाजारातील औषधी इ.
- गाभण कालावधी, तसेच विल्यानंतर संतुलित खुराक किंवा पिष्टमय पदार्थयुक्त खुराक द्यावा. भरडलेला मका किंवा गव्हाचा कोंडा हे ऊर्जेचे चांगले स्रोत आहेत.
- जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हशीमध्ये ऊर्जेच्या कमतरतेमुळे सौम्य किटोसीस दिसून येतो. यामध्ये दूध उत्पादन अपेक्षित मिळत नाही किंवा कमी होते.
- म्हशीच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण तपासल्यास किटोसीस अाजाराचे निदान होते.

-डॉ. एम. व्ही. इंगवले,
स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या